scorecardresearch

Premium

पारपत्र परत करण्याची आर्यन खानची मागणी; एनसीबीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आरोप मागे घेतल्यानंतर एक महिन्याने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने विशेष न्यायालयात धाव घेतली आहे.

aryan khan
आर्यन खान

मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आरोप मागे घेतल्यानंतर एक महिन्याने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. यात पारपत्र परत करण्याची मागणी त्याने केली आहे. त्याच्या अर्जावर १३ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने एनसीबीला दिले आहेत.

एनसीबीने आर्यनसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर आर्यनने हा अर्ज केला आहे. त्यात प्रकरणातून दोषमुक्त केल्याचा औपचारिक आदेश देण्याची तसेच जामीन मंजूर करताना घातलेली बंधपत्राची अटही रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष न्यायालयासमोर आर्यनच्या या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने या अर्जावर एनसीबीला उत्तर दाखल करण्यास सांगून प्रकरणाची सुनावणी १३ जुलै रोजी ठेवली.

dombivli police appointment, dombivli manpada police station, senior inspector of police ashok honmane
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याला पाच महिन्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कल्याणचे अशोक होनमाने
epfo Higher Pension
Money Mantra : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उच्च पेन्शन पर्याय निवडण्याची मुदत पुन्हा वाढवली
father and son arrested for denying office space to marathi woman in mulund
मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकरणाऱ्या पिता – पुत्राला अटक
Asha workers protest in Panvel
पनवेल : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी आशा वर्करची निदर्शने

पुरेसे पुरावे नसल्याचे सांगून क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन खानसह सहाजणांवरील आरोप मागे घेतल्याचे एनसीबीने २७ जून रोजी स्पष्ट केले होते. तसेच प्रकरणाच्या नव्याने चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने वस्तुनिष्ठ पद्धतीने तपास केला. केवळ साशंकतेच्या पलीकडे ठोस पुरावे मिळवण्याच्या तत्त्वाचा वापर या प्रकरणाचा तपास करताना केला गेला, असा दावाही एनसीबीने केला होता. क्रूझवर छापा टाकण्यात आला, तेव्हा आर्यन आणि अन्य काहीजण वगळता उर्वरित आरोपींकडे अमली पदार्थ सापडले. त्यामुळे आर्यनसह सहाजणांविरोधात पुरेशा पुराव्याअभावी तक्रार दाखल केली गेलेली नाही, असेही एनसीबीने स्पष्ट केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aryan khan demand return of passport order clarify role ncb ysh

First published on: 01-07-2022 at 01:39 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×