ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरू आशा जोगळेकर यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने अंधेरी येथे निवासस्थानी निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात अभिनेत्री व नृत्यांगना अर्चना जोगळेकर या कन्या तसेच २ पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आशा जोगळेकर या गेली पन्नास वर्षे ‘अर्चना नृत्यालया’च्या माध्यमातून कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण देत होत्या. त्यांनी अनेक शिष्य घडविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha joglekar passes away
First published on: 19-03-2016 at 03:02 IST