scorecardresearch

Premium

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आशिष शेलारांचा ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “मुंबईकरांसमोर उघडे…”

“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?”, असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

ashish shelar on thackeray bmc corruption
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून आशिष शेलारांची ठाकरेंवर टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी अज्ञातांनी हल्ला केला होता. संदीप देशपांडे मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढणार होते, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा मनसेने केला होता. यावरून आता भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड आशिष शेलार यांनी घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारावरून शेलारांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत?”, असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
Raj Thackeray Ashish Shelar
वरिष्ठांचा युतीबाबतचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटलात? आशिष शेलार म्हणाले, “आम्ही साद घालायला…”
SANJAY RAUT
शेतकरी आंदोलनावरून संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले “दिल्ली काय मोदींच्या…”
uddhav-thackeray-20
“मराठवाडा ही संतांची भूमी आहे या ठिकाणी गद्दारांना…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

हेही वाचा >> विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे जाणार? अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपाची कोंडी करायची असेल तर…”

“मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे “कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे?”, असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

“आम्ही तर रोज विचारणार.. कोविडमध्ये “कफना”त पण “कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत!!”, असं शेलार म्हणाले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने १५० चे टार्गेट ठरवले आहे. मिशनच्या अंमलबजावणीसाठी पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.त्यामुळे मुंबईत केंद्रीय मंत्र्यांचेही दौरे वाढले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashish shelar targeted to uddhav thackeray group over bmc corruption sgk

First published on: 20-06-2023 at 11:51 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×