नाराज सचिन सावंत यांची पदमुक्तीची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे सध्या पक्षाची प्रभावीपणे बाजू मांडणाऱ्या सचिन सावंत यांनी नाराज होऊन प्रवक्ते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी यांनी पक्षाकडे के ली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदेश काँग्रेसने नव्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यात लोंढे यांची मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. राजकीय कार्यक्र माची जबाबदारी  हुसेन दलवाई व गणेश पाटील, पक्षाच्या विविध आघाड्या व विभागांची जबाबदारी अलीकडेच भाजपमधून पक्षात दाखल झालेल्या डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली.  सचिन सावंत हे राज्यातील भाजप सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत असत. त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले होते.  नव्या रचनेत फक्त प्रवक्ते पदी कायम ठेवण्यात आल्याने सावंत यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाकडे के ली. प्रवक्ते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून अन्य जबाबदारी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केल्याचे सावंत यांनी सांगितले.