बकरी ईदसाठी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाने बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास मनाई केली आहे. यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहेत. उच्च न्यायालयाने मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
बकरी ईदनिमितत् फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास उच्च न्यायलयाने मनाई केली आहे. यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहे. उच्च न्यायालयाने मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
बकरी ईदसाठी पालिकेने ऑनलाइन जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधून तात्पुपत्या काळासाठी बकरे कटाईचे परवाना देण्याचं सूचित करण्यात आलं होतं. मात्र काही प्राणीमित्र संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल करत या निर्णयाला आव्हान दिलं होतं. यावेळी त्यांनी घरांमध्ये आणि सोसायटी परिसरात दिल्या जाणाऱ्या कुर्बानीलाही विरोध केला होता. प्राणी संरक्षण कायद्यासह महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत सांगण्यात आलं होतं.