बँकेशी निगडीत तुमची काही कामं असतील तर ती आजच उरकून घ्या, कारण उद्यापासून सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे. २४ डिसेंबरला ईद-ए-मिलाद, तर २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त बँक कर्मचाऱयांना सुट्टी आहे. तसेच २६ नोव्हेंबरला चौथा शनिवार व २७ नोव्हेंबर रविवार आहे, असे सलग चार दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे महत्त्वाचे बँक व्यवहार आजच उरकून घ्यावे लागतील. नाहीतर ग्राहकांना थेट सोमवारपर्यंत बँका उघडण्याची वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, याकाळात ग्राहकांची गैरसोय काही प्रमाणात टाळण्यासाठी एटीएम सेवा अखंडित सुरू राहण्यासाठी शनिवारी केवळ एटीएम मशिनमध्ये पैसे टाकण्यासाठी बँका काही वेळासाठी सुरू राहणार आहेत. पण या काळात बँकेचे कुठेलेही व्यवहार होणार नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
बँकेचे व्यवहार आजच करा, उद्यापासून चार दिवस बँका बंद
बँकेशी निगडीत तुमची काही कामं असतील तर ती आजच उरकून घ्या
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 23-12-2015 at 15:07 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks to remain closed for four days