मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने बोरिवली पूर्वेला असलेल्या एलोरा बारवर शनिवारी रात्री छापा टाकला. या वेळी या बारमधील निशा नावाच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी बारवर छापा टाकून तेथील महिला वेट्रेसना ताब्यात घ्यायला सुरुवात करताच निशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे समजते. मात्र तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या बारमध्ये ‘वेट्रेस’ म्हणून काम करणाऱ्या २३ महिला सापडल्या.