दीड वर्षांत ८० किलो वजन कमी करणार

समाज माध्यमांवरील चर्चेनंतर वजन कमी करण्यासाठी मुंबईत आलेले पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत यांच्यावर बॅरियाट्रीक शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र त्यांचे वजन १८० किलो असल्याने प्रथम आहार व व्यायामाच्या साहाय्याने दीड वर्षांत ८० किलो वजन कमी करण्यात येईल आणि त्यानंतर बॅरियाट्रीक शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यांच्यावर सैफी रुग्णालयात डॉ. मुझ्झफर लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली  उपचार होणार आहे.

१९९३ मध्ये जोगावत यांची मध्य प्रदेशात त्यांच्या मूळ गावी पित्त मूत्राशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढल्याने जलद गतीने वजन वाढण्यास सुरुवात झाली. बॅरियाट्रीक शस्त्रक्रिया करण्यासाठी वजन आटोक्यात आणणे आवश्यक असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. जोगावत यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासंदर्भात आजार असल्याने लगेचच शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरू शकते. जोगावत हे मध्य प्रदेशातील पोलिसात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

१० मार्चला जनुकीय चाचणी अहवाल मिळणार

इमानच्या जनुकीय चाचण्यांचा वैद्यकीय अहवाल १० मार्चपर्यंत मिळणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. हे अहवाल मिळाल्यानंतर इमान हिच्यावर काय उपचार काय करावयाचा हे ठरवता येणार आहे. सध्या इमान हिला औषधे देऊन तिच्या शरीरातील अतिरिक्त पाणी मूत्रविसर्जनातून शरीराबाहेर काढण्यात येत आहे. आतापर्यंत इमानचे ५० किलो वजन घटवण्यात आले आहे.