मुंबई : पाकिस्तानात सुपर लीग (पीएसएल) सामन्यांसाठी ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चौकडीला अटक करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले. संगणकीय प्रणालीचा वापर करून आरोपी सट्टा स्वीकारत होते. वर्सोव्यातील एका बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, ११ मोबाइल, नोंदवही आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी ऑनलाईन सट्ट्यापोटी स्वीकारलेली रक्कम तीन बँक खात्यांमध्ये जमा झाली होती. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक पजवानी, पुखराज ध्रुव, शुभम बलवानी आणि शंतनू चक्रवर्ती अशी अटक आरोपींची नावे आहेत. पीएसएल स्पर्धेत गुरुवारी इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर या दोन संघांमध्ये सामना होता. या क्रिकेट सामन्यावर अंधेरी येथून काही सट्टेबाज ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने वर्सोवा येथील एका बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी पहिल्या मजल्यावर चौघे जण लॅपटॉपवर पीएसएलचे सामने पाहत होते. त्याद्वारे ते सट्टा स्वीकारत होते. संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत ते सट्टेबाजीत सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडील एक नोंदवही, अकरा मोबाइल, तीन लॅपटॉप, रोख दोन लाख दहा हजार रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सट्टेबाजीद्वारे स्वीकारलेली रक्कम तीन विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. त्याबाबत बँकेद्वारे पोलीस अधिक तपास करीत आहेत. आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंध, भारतीय टेलिग्राफ कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली.

Umpire Richard Kettleborough on Sanju Samson and Team India
T20 World Cup 2024 : ‘या’ खेळाडूला जर संधी मिळाली नाही तर त्याने भारताचे नुकसान, दिग्गज अंपायरचा निवडकर्त्यांना इशारा
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Conflict between Iran and Israel Avoid traveling between both countries India advice to citizens
इराण- इस्रायलमध्ये तणाव: दोन्ही देशांतील प्रवास टाळा; भारताचा नागरिकांना सल्ला
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत धमकीची पोस्ट करणारा तरुण पुण्यातून ताब्यात

हेही वाचा – मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव

सट्टेबाजीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर

आरोपी १०० पॅनल व आरडी २४७ विन या लिंकचा वापर करून सट्टा घेत होते. सट्टे घेण्यासाठी एमकेएसके डब्ल्यू, रॅम ॲट द रेड ४२४२ व डिपॉझीट १५६ या युजर नेमचा वापर करत होते. तसेच फेअरप्ले, क्रिकेट बेट या संकेतस्थळाचाही आरोपी वापर करीत होते. त्याबाबत सायबर तज्ज्ञांच्या मदतीने अधिक तपास करण्यात येत आहे.