प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. भारदस्त आवाज, खुमासदार व अभ्यासपूर्ण निवेदन ही त्यांच्या निवेदनाची वैशिष्ट्ये होती. मराठी साहित्यांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. मराठीतील अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांची निवेदनाच्या शैलीतून प्रेरणा घेत अनेकांनी ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम कसा खुलवायचा हे त्यांना चांगले ठाऊक होते. अनेक गाण्यांचे कार्यक्रम, संगीत मैफली भाऊनी आपल्या निवेदन शैलीने खुलवल्या होत्या. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी आपल्या खास निवेदन शैलीने रंग भरले होते. ‘सरीवर सरी’ या कार्यक्रमाचे निवेदन करून त्यांनी आपल्या करकिर्दीची सुरूवात केली होती पण दुर्दैवी योगायोग म्हणजे ‘सरीवर सरी’ हा त्यांचा शेवटाचा कार्यक्रम ठरला. १३ आँगस्ट रोजी दादर येथे ‘सरीवर सरी’ कार्यक्रमाचे निवदेन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित कन्या, जावई व नातू असा परिवार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2016 रोजी प्रकाशित
प्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे यांचे निधन
शिवाजी पार्क येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 26-08-2016 at 10:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhau marathe passess away