गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या चर्चेत असून आज ते सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्स बजावलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं होतं. दरम्यान किरीट सोमय्यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, “मला समन्स बजावण्यात आलं आहे. हजर व्हा अन्यथा कायदेशीवर कारवाई होईल. ठाकरे महाशय ते तुमचे प्रवक्ता संजय राऊत बाप, बेटे जेलमध्ये जातील असं सांगत आहे. आम्ही हजार वेळा जेलमध्ये जाऊ. यासाठी आम्हाला जेलमध्ये पाठवणार आहात का?,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

“पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, CISF ने सांगितलेले…”, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला

“भुजबळांची १०० कोटींची संपत्तीविषयी मी हायकोर्टात याचिका केली होती त्यामुळे भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. ४ सप्टेंबरला ती संपत्ती बेनामी घोषित करुन जप्त करण्यात आली. त्याच्या पाहणीसाठी गेलो होतो आणि त्यासाठी उद्धव ठाकरे मला जेलमध्ये पाठवत आहेत. पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी जी संपत्ती जमा केली आहे ती जप्त करुन जनतेला देणार”.

Story img Loader