scorecardresearch

Premium

“तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?”, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

आशिष शेलार यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना टीका केली आहे.

What Ashish Shelar Said?
आशिष शेलार यांचं ट्विट चर्चेत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांचा उल्लेख मस्टर मंत्री असा केला होता. यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईसाठी आम्ही काय केलं तुम्ही कोण? आमचे मामा की काका? असा प्रश्न विचारत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हटलं आहे आशिष शेलार यांनी?

अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती! म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचाराना…त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशेब देऊच! तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!!

Anand Mahindra proud of Class 4 student who helped specially-abled child
आनंद महिंद्रांनी शाळकरी विद्यार्थींनीचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले, “अगदी छोटीशी, साधी गोष्ट पण…”
What Eknath Shinde Said?
“बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरसा बघावा, कारण..”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Madhavi Mahajani balasaheb thackeray memory
नोकरी करताना झाला त्रास, बाळासाहेब ठाकरेंना कळालं अन्…; गश्मीर महाजनीच्या आईने सांगितला प्रसंग, म्हणाल्या, “मीनाताईही…”
Bareilly Maulana Tauqeer Raza
“बाबरी शहीद केली आणि तीन हजार..”, मौलाना तौकिर रजा यांचं वक्तव्य, आडवाणींना म्हणाले ‘मानवतेचे मारेकरी’

शेलार यांनी ही टीका केली आहे तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस हे मस्टर मंत्री नाहीत, ते मास्टर आहेत. त्यांच्याच मास्टर स्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावं लागलं, असा हल्लाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी चढवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं असा टोला बावनकुळेंनी म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader ashish shelar slams uddhav thackeray and ask are you our uncle scj

First published on: 07-08-2023 at 10:34 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×