मुंबई : भाजपच्या खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांचा केंद्रातील भाजपचे मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी अपशब्द वापरून अवमान केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कुलस्ते यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. हेमा मालिनी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्याने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिला अत्याचारांच्या विरोधात भूमिका घेऊ असे अभिवचन दिले होते. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक  मंत्री भाजपाच्याच महिला खासदारांबद्दल असे बोलतात हे गंभीर आहे व निषेधार्ह आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

राज्याचे एक मंत्री गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनींबाबत जे वक्तव्य केले होते, त्याच पठडीतील कुलस्ते यांनी वक्तव्य केले आहे. कुलस्ते यांनीही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp and actress hema malini bjp minister insulted using profanity akp
First published on: 20-02-2022 at 01:03 IST