पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर शौचालये नसल्यामुळे वाटसरूंची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे शौचालये बांधण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही द्रुतगती महामार्गाची पाहणी केली आणि शौचालये बांधण्यासाठी ११ ठिकाणे निश्चित करण्यात आली. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने या अकरा ठिकाणी शौचालये बांधण्यास पालिकेला परवानगी दिली़
शौचालयांसाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे
पूर्व द्रुतगती महामार्ग : चेंबूर येथील राहुल नगर क्रमांक १, प्रियदर्शनी बस थांबा, घाटकोपर येथे कामराज नगर भुयारी मार्ग, विक्रोळी गोदरेज गेटजवळ, भांडूप गावाजवळील पादचारी उड्डाणपुलालगत, विक्रोळी बस थांब्याजवळ, अंधेरी येथे एस. व्ही. मार्ग जंक्शन
पश्चिम द्रुतगती महामार्ग : जोगेश्वरी येथे इस्माईल युसूफ महाविद्यालयाजवळ पूर्व आणि पश्चिम बाजूस, गोरेगाव येथे दिंडोशी उड्डाणपुलाजवळ, कांदिवली उड्डाणपुलानजीकच्या समता नगर पोलीस ठाण्याजवऴ
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास पालिकेला परवानगी
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर शौचालये नसल्यामुळे वाटसरूंची प्रचंड गैरसोय होत आहे.
First published on: 24-07-2013 at 02:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc approval of 11 public toilets construction on highway