मुंबई शहर आणि उपनगरातील ‘स्पा’ केंद्रांसाठी लवकरच नवी नियमावली तयार केली जाणार आहे. महापालिका आरोग्य समितीच्या मंगळवारच्या बैठकीत तसे आदेश आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी दिले. माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी या बाबत सांगितले की, शहर आणि उपनगरात मोठय़ा संख्येने ‘स्पा’ केंद्रे उभी राहिली असून काही केंद्रांमध्ये अनैतिक प्रकार सुरू आहेत. केश कर्तनालय, ब्युटी पार्लर यांना जशी नियमावली आहे तशी ती ‘स्पा’केंद्रांना आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर ‘स्पा’ केंद्रांसाठी कोणतीही नियमावली नसल्याचे समोर आले. तेव्हा आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी नवी नियमावली तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. प्रशासनाचा त्याबाबतचा आधीचा प्रस्तावही परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.