अभिनेता शाहीद कपूरपाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या खार येथील घरामध्ये तीन ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने सापडल्याने पालिकेने तिला नोटीस बजावली आहे. सुश्मिता सेनवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खार येथील आंबेडकर रोडवरील सुद्गुरू सुंदरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील सहाव्या मजल्यावर सुश्मिता सेन राहते. या इमारतीमध्ये पालिकेतर्फे डासांच्या उत्पत्तीस्थानांची तपासणी करण्यात येत होती, मात्र तब्बल आठ दिवस सुश्मिता सेन यांनी विविध कारणे पुढे करीत आपल्या घरात डास शोधकांना प्रवेश नाकारला होता. गेल्या शुक्रवारी अखेर डास शोधकांनी तिच्या घराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान तीन ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही उत्पत्तीस्थाने नष्ट केली. सुश्मिता सेन यांना पालिकेने कलम ३८१ ब अन्वये नोटीस बजावली आहे. त्यामुळे लवकरच तिच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc notice to sushmita sen
First published on: 26-09-2016 at 02:19 IST