मुंबईत सोमवारपासून प्लास्टिक बंदीची मोहीम सुरू झाली असून गेल्या पाच दिवसात ५९३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर २६८ प्रकरणांमध्ये १३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. चेंबूर, गोवंडी, नायगाव, दादर, माहीम परिसरातून एका दिवसात सर्वाधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर देवनार, गोवंडी परिसरात मात्र कारवाईला मनुष्यबळाऐवजी सुरूवात होऊ शकली नाही.

हेही वाचा >>> एक्स बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून बलात्काराचा गुन्हा, २२ वर्षीय तरुणाची सुटका करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Raigad, Private bus caught fire,
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग
Jalgaon Massive Explosion, Maurya Chemical Company, 20 Employees Injured, jalgaon midc, fire in Maurya Chemical Company, marathi news, fire in jalgaon, jalgaon news
जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही

मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत समन्वयाने प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली. पथकामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबतच मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावरील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच पोलीस दलातील एक कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येत आहे. करोना कालावधीनंतर १ जुलै २०२२ पासून विभागामार्फत दंडात्मक कारवाईला सुरूवात करण्यात आली होती. मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई धडाक्याने सुरू झाली होती. मात्र करोना संकटामुळे दोन वर्ष प्लास्टिक कारवाई थांबली होती. आता महानगरपालिकेने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले इत्यादी ठिकाणी कारवाई हाती घेण्यात आली आहे.आरोग्याला घातक आणि पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी सखलभागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. या आठवड्यापासून प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईला वेग आला आहे. गेल्या पाच दिवसांत पथकाने विविध दुकाने, मंडयांना भेटी देऊन प्लास्टिक जप्त करून दंडात्मक कारवाई केली आहे.

हेही वाचा >>> सुरतमधील ५६ तासांच्या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांचे हाल; ५९ रेल्वेगाड्या रद्द, ३० गाड्या अंशतः रद्द

किती कारवाई

२१ ते २५ ऑगस्ट पाच दिवसात शहर व उपनगरात ६ हजार १८ ठिकाणी भेटी देण्यात आल्या. यात दुकानदारांसह फेरीवाले व अन्य आस्थापनाचा समावेश आहे. या कारवाईत २६८ जणांविरूद्ध पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २५ ऑगस्ट रोजी एका दिवसात १०९९ ठिकाणी धाड टाकण्यात आली. त्यातून १०७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर २५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

असा आहे दंड

प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.