उच्च न्यायालयाकडून कायम
मुंबई : हिंजवडी येथे २०१० मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तिघा आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली. मात्र हा निर्णय देताना न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचे पीडित तरुणीच्या उलटतपासणीवेळीचे वर्तन तसेच त्याला आक्षेप न घेता मौन बाळगणाऱ्या सत्र न्यायाधीशांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केला.
खटल्यादरम्यान पीडित तरुणीच्या सन्मानाचे संरक्षण करण्यात संबंधित सत्र न्यायाधीश अपयशी ठरल्याचे ताशेरे न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ओढले. आरोपींच्या वकिलांकडून पीडितेला अयोग्य प्रश्न विचारले जात असताना सत्र न्यायाधीशांनी निष्क्रियता दाखवण्याऐवजी हस्तक्षेप करायला हवा होता. सरकारी वकिलांनाही पीडितेला बचाव पक्षाकडून अयोग्य प्रश्न विचारले जात असताना आक्षेप घ्यावासा वाटला नाही, याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
सुभाष भोसले, गणेश कांबळे आणि रणजित गाडे या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मात्र योग्य ठरवला.