मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर मार्गास लागूनच असलेल्या वसई खाडीवरील वरसावे येथील पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. सहा जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस गर्डरला तडे गेल्यामुळे हा पूल वाहतूकीस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे जुन्या पुलालगत असलेल्या नव्या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु ठेवण्याची कसरत वाहतूक पोलिसांना करावी लागत होती. मात्र त्यामुळे मुंबई-गुजरात महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असे. घोडबंदर मार्ग, मीरा-भाईंदर, दहिसर या भागातील महामार्गावरील वाहतूकीचा यामुळे दररोज खोळंबा होत असे. अखेर जून महिन्यात या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात येणार असली तरी अवजड वाहनांना मात्र प्रवेशबंदी कायम ठेवण्यात येणार आहे.
हा पूल १९७० मध्ये बांधण्यात आला असून या पुलाच्या गर्डरला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. २६ डिसेंबरपासून या पुलावरील संपूर्ण वाहतूक तातडीने बंद करून पुलालगत असलेल्या नव्या पुलावरून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. या प्रकारामुळे या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना  मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेमणूक ठरल्याप्रमाणे झाली नाही. संचालकांअभावी महामंडळाचा कारभारच ठप्प झाला. अध्यक्ष म्हणून काम करणे बापट यांना अशक्य झाले. त्याचबरोबर संचालकच नसल्याने कंपनी कायद्याप्रमाणे संचालक मंडळाची बैठकही होऊ शकली नाही.
या गैरकारभाराला कंटाळलेल्या डॉ. बापट यांनी सर्व घडामोडींचा आढावा घेत ‘या अशा वातावरणात काम करणे शक्य नसल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देणे आपल्याला भाग पडत आहे,’ असे नमूद करत १२ मे २०१४ रोजी पदाचा राजीनामा देणारे पत्र राज्यपालांकडे पाठवले. तसेच कंपनी निबंधकांनाही आपल्या राजीनाम्याचे पत्र पाठवत राजीनाम्याची कारणे डॉ. बापट यांनी कळवली आहेत.