मुंबईतील कराची स्वीट्स या बेकरीचं नाव बदलण्याच्या मागणीवरुन आता राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केलेल्या या मागणीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराचीच एक दिवस भारतात असेल असं म्हटलं. त्यानंतर संजय राउत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
First, bring the Kashmir that is occupied by Pakistan. We will go to Karachi later: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/z15UjkAI5H pic.twitter.com/gfwMmr34hT
— ANI (@ANI) November 23, 2020
फडणवीसांवर टीका करताना राउत म्हणाले, “आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीच नंतर बघू”
कराची एक दिवस भारतात असेल – देवेंद्र फडणवीस
शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या साखळी बेकरीचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. यावर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कराची शिवसेनेच्या भूमिकेला टोलवत उलट “आमचा ‘अखंड भारत’वर विश्वास आहे. आम्हाला विश्वास आहे की कराची एक दिवस भारताचा भाग असेल.” असं म्हटलं होतं.
मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली नुकतीच केली होती. कराची पाकिस्तानातील शहर आहे त्यामुळे या शहराच्या नावानं भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होतो अस नांदगावकर यांनी आपल्या मागणीवर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं.
दरम्यान, “मुंबईत मागील ६० वर्षांपासून कराची बेकरी आणि कराची स्वीट्स आहे. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. आता त्यांच नाव बदलण्यास सांगण्यात काहीच तथ्य नाही. त्यांच नाव बदलण्याची मागणी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.