मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी, तसेच देखभाल-दुरूस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

Western Railway, block on Western Railway,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लाॅक
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
22 local trains on Western Railway cancelled
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील २२ लोकल फेऱ्या रद्द
Heavy rains in Gujarat many trains cancelled
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…
Mumbai - Ayodhya Special Train, Ayodhya Train,
मुंबई – अयोध्या विशेष रेल्वेगाडी
block Western Railway, Goregaon-Kandivali route,
पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा ब्लॉक, गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू
Sunday, megablock, Central Railway, Western Railway, local services,
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Escalators, Kalyan Railway Station, Kalyan,
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी

कुठे : माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा : मुंबई: ३३ वर्षांपासून फरार आरोपी अटकेत

हार्बर मार्ग

कुठे: पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येईल. तर, ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असतील. ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते वाशी लोकल चालवण्यात येतील. ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स -हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. तर, बेलापूर / नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका उपलब्ध असेल.

हेही वाचा : मुंबई: गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी सहा विशेष गाड्या

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : शनिवारी रात्री १२ ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅककालावधीत बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येतील. तर, रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लाॅक नसेल.