भायखळा तुरुंगात झालेल्या अमानुष मारहाणीनंतर मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. ज्या प्रकरणात तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांना निलंबित करण्यात आले होते. भायखळा तुरुंगात मंजुळा शेट्येला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मागील वर्षी जून महिन्यात ही घटना घडली होती. ज्यानंतर चंद्रमणी इंदुलकर यांचे निलंबन करण्यात आले. मात्र कोर्टाने त्यांना क्लिन चिट दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भायखळा येथील ऑर्थर रोड तुरुंगात कैद्यांना देण्यात येणारी अंडी आणि पाव यांचा हिशेब लागत नसल्याचे कारण पुढे करुन ऑर्थर रोड तुरुंगात मंजुळा शेट्येला मारहाण करण्यात आली होती. वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिला पोलिसांह एकूण सहा पोलिसांना अटक करण्यात आली. मंजुळा शेट्येला झालेल्या मारहाणीनंतर तुरुंगातील महिला कैद्यांनी तुरुंगाच्या गच्चीवर जाऊन आंदोलन केले होते. शीना बोरा हत्याकांडात अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीने मंजुळा प्रकरणा पोलिसांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. आता या प्रकरणी तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांना क्लिन चिट देण्यात आली आहे.

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही आवाज उठवला होता. तुरुंग अधीक्षक ही एवढी मोठी घटना घडत असताना शांत का बसले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान चंद्रमणी इंदुलकर हे २२ आणि २३ जूनला पुण्यात असलेल्या एका सेमिनारसाठी गेले होते. त्यामुळे या दोन दिवसात जे घडले त्याची कल्पना त्यांना नव्हती असे सांगण्यात आले. तुरुंग अधीक्षकाने या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घ्यायला हवी होती असे सांगत त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता त्यांना या प्रकरणी क्लिन चिट देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Byculla jail superintendent chandramani indurkar gets clean chit in manjula shetye murder case
First published on: 23-02-2018 at 16:32 IST