पनवेल शीव महामार्गवर कामोठेजवळ पुरुषार्थ पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलावरुन एक कार प्रवाशांसह खाडीमध्ये पडली. ही घटना रात्री साडेदहा वाजता घडली. खारघर येथून येणाऱ्या या कारमध्ये चालकासह एक महिला आपल्या मुलीसह प्रवास करत होती. या मार्गावरुन जाणाऱ्या विकी नावाच्या मुलाने धाडसाने या मायलेकींना पाण्याबाहेर काढल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी दिली. खाडीजवळ राहणाऱ्या एका मच्छीमारांची मदत घेऊन विकीने या मायलेकींना वाचविले. या मायलेकींचे नाव मीरा मुरली आणि वैष्णवी मुरली अशी आहेत. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकीने पोलीसांना संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी कामोठे पोलीस व वाहतूक पोलीसांनी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान मोटार व चालकाचा शोध घेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car with mother daughter crashed into a creek at kharghar bridge
First published on: 07-10-2014 at 03:34 IST