मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्य़ात एकाला अटक केली आहे. ही या प्रकरणातील पहिली अटक आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल के ला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष जगताप असे अटक केलेल्याचे नाव आहे. ठाण्याचा रहिवासी असलेल्या जगताप अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करायचा, असा आरोप आहे.  रविवारी त्याला ठाण्यातून सीबीआयने अटक केली.  ४ नोव्हेंबपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख  व इतरांविरोधात गुन्हा दाखल आहे.  पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  तक्रारीनुसार, पदावर असताना त्याचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले असून त्यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच वाझेला पोलीस सेवेत घेणे व त्यानंतर संवेदनशील गुन्ह्य़ांचा तपासही देणे, हे देशमुख यांना माहिती होते, असे तक्रारीत म्हटले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून तत्कालीन गृहमंत्री व इतर व्यक्तींचा बदली व नियुक्तीवर प्रभाव होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi makes first arrest in anil deshmukh case zws
First published on: 01-11-2021 at 03:07 IST