मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भांडूप – कांजूरमार्गदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जतवरुन सुटलेल्या फास्ट लोकलमध्ये भांडूप आणि कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान बिघाड दुरुस्त झाला आहे.  मात्र वाहतूक उशिरानं सुरु आहे. बंद पडलेल्या लोकलचा अन्य लोकल रेल्वेवर परिणाम झाला असून लोकलच्या रांगा लागल्या आहेत.

लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सकाळची वेळ असल्याने अनेकजण कामावर पोहोचण्यासाठी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करत असतात. त्याचवेळी हा बिघाड झाल्याने प्रवासी खोळंबले आहेत.