scorecardresearch

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. 

संग्रहित छायाचित्र
पारसिक बोगद्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेवर पारसिक बोगद्याजवळ सिग्नल यंत्रणेत बुधवारी दुपारी बिघाड झाला. या बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाडामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. रेल्वेचे पथक घटनास्थळी असून सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान, मंगळवारी देखील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कल्याण- विठ्ठलवाडी दरम्यान रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central railway signal failure parsik tunnel local train service delayed

ताज्या बातम्या