scorecardresearch

माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवासही वातानुकूलित; वातानुकूलित सलून कोचची जोडणी, भाडे दर मात्र अव्वाच्यासव्वा

नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे पूर्वनोंदणी करून रात्रीच्या मुक्कामासाठी उपलब्ध असणार आहे.

AC coach on Neral-Matheran service
वातानुकूलित डबा Central Railway twiiter

मुंबई: नेरळ ते माथेरान मिनि ट्रेनचा प्रवासही आता वातानुकूलित होणार आहे. मिनि ट्रेनला वातानुकूलित एक विशेष सलून (आरामदायक डबा)डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा वातानुकूलित डबा आठ आसनी असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे पूर्वनोंदणी करून रात्रीच्या मुक्कामासाठी उपलब्ध असणार आहे.

मिनि ट्रेनची वेळ

नेरळ ते माथेरान सेवा

ट्रिप ए- नेरळहून सकाळी ०८.५० वाजता सुटेल आणि माथेरानला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.

ट्रिप बी-नेरळहून सकाळी १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी ०१.०५ वाजता पोहोचेल.

माथेरान ते नेरळ

ट्रिप सी- माथेरानमधून ०२.४५ वाजता सुटून नेरळला दुपारी ०४.३० वाजता पोहोचेल

ट्रिप डी- माथेरानमधून दुपारी ०४.०० सुटून नेरळला सायंकाळी ०६.४० वाजता पोहोचेल.

भाडे रचना

-एकाच दिवशी राऊंड ट्रिपसाठी ३२ हजार ०८८ रुपये करांसहीत.

-आठवड्याअखेरीस (वीकेंडला) ४४ हजार ६०८ रुपये करांसह

-रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप: आठवड्यातील दिवशी ३२ हजार ०८८ रुपये करांसहीत आणि त्याव्यतिरिक्त दीड हजार रुपये प्रति तास

-आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४ हजार ६०८ रुपये करांसह आणि अन्य शुल्कासह १,८०० रुपये प्रति तास आकारले जातील.

१० हजार रुपये सुरक्षा ठेवीसह वातानुकूलित सलून बुक करू शकतात

पर्यटक एकूण भाड्याच्या २० टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या सात दिवस अगोदर १० हजार रुपये सुरक्षा ठेवीसह वातानुकूलित सलून बुक करू शकतात. उर्वरित ८० टक्के प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाले असे मानले जाणार आहे. ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 22:01 IST