मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही खासगी कंपन्यांना कंत्राटे देण्याच्या मोबदल्यात मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या आपल्या संस्थेला देणग्या मिळविल्याप्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी या चौकशीतून निर्दोष बाहेर पडेन, असा ठाम विश्वास माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
तेलगी घोटाळाप्रकरणी आपली विशेष चौकशी पथकाकडून चौकशी झाली होती. तेव्हाही आपले नाव गोवण्यात आले होते. पण चौकशीत काहीच हाती लागले नाही. आता काही हितशत्रूंनी आपल्या मागे शुक्लकाष्ठ मागे लावले आहे. महाराष्ट्र सरकारने खुल्या चौकशीस मान्यता दिली आहे. पण या साऱ्या चौकशांमधून निष्कलंक बाहेर पडेन, असा दावा भुजबळ यांनी केला.