महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून मोटरसायकलवरून पळ काढणाऱ्या चोराला एका हवालदाराने जीवाची बाजी लावून परळ येथे अटक केली.त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून अन्य गुन्ह्यांचीही कबुली पोलिसांना मिळाली.
परमार नावाच्या वृद्धा शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हिंदमाताहून परळला चालत येत होत्या. त्यावेळी आझम इस्तिया खान या तरुणाने आपल्या वाहनाचा वेग कमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. आझम आपल्या मोटरसायकलीवरून पळ काढत असताना तुळपुळे पुलाजवळ डय़ुटीवर असलेल्या नवनाथ घाटे या हवालदाराने पाठलाग केला. याच दरम्यान हवालदार दुर्गेश पार्टे यांनी घटनास्थळी धाव घेत घाटे यांची मदत केली.  अखेर या दोघांनी आझमला पकडले. आझमला भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.