कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघाडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयातून सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. भुजवळ सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. भुजबळ यांना सोमवारी छातीत दुखू लागले.  त्यामुळे त्यांना तातडीने सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवले. ते शुद्धीवर असले, तरी त्यांची प्रकृती अस्थिर आहे. प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना पुन्हा जे. जे. रुग्णालयात हलवण्यात येईल, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयातील औषध विभागाचे प्रमुख रोहन सेक्वेरिया यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal in hospital
First published on: 19-04-2016 at 03:52 IST