मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जातीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे  १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. याबाबत राज्य सरकारने पाठपुरावा केला असता, सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने कळविले आहे. बऱ्याच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने  स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister pm reminder marathi language akp
First published on: 25-12-2019 at 02:35 IST