मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. १० नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर आता २१ दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचएन रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली होती. गुरुवारी केलेल्या तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

रुग्णालयात असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackeray discharged from hospital abn
First published on: 02-12-2021 at 10:49 IST