* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
सरकारी कर्मचाऱ्यांनी दरवर्षी शासनास सादर करण्याची मालमत्तेची माहिती आता सर्व निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांना देखील द्यावी लागणार आहे. अशी माहिती देणे अनिवार्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला.
नागरी सेवेतील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या मालमत्तेसंबंधीचे मत्ता व दायित्व विवरण सादर करणे आवश्यक आहे. दरवर्षी ३१ मे पर्यंत ही माहिती संबंधितांना सादर करावी लागते. राज्य शासनाच्या अखत्यारीतील निमशासकीय संस्था, पंचायत राज संस्था, नगरपरिषदा, महानगरपालिका, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळे यामधील कर्मचाऱ्यांना यामधून वगळण्यात आले होते. वास्तविक पहाता या सर्व संस्थांवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक असून सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याबाबतीत समान धोरण असावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. आता या निर्णयामुळे सिडको, एमएमआरडीए, नगरपरिषदा आणि महानगरपालिकांसह सर्व संस्थांमधील अधिकाऱायंसह कर्मचारी यांना मालमत्ता आणि दायित्वे यांची वार्षिक विवरण पत्रे आपल्या विभाग प्रमुखांना सादर करावी लागणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Nov 2014 रोजी प्रकाशित
निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही मालमत्ता जाहीर करावी लागणार
सरकारी कर्मचाऱ्यांनी दरवर्षी शासनास सादर करण्याची मालमत्तेची माहिती आता सर्व निमशासकीय संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदांमधील कर्मचाऱ्यांना देखील द्यावी लागणार आहे.

First published on: 14-11-2014 at 03:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis important decision on government and semi government employees