मुंबई : मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी रुपये, तर जगन्नाथ शंकरशेट स्मारकासाठी ३५ कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा, जगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजीशेठ कीर स्मारकाबाबत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी मुंबई महापालिकेने ६० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, तर मुंबादेवी मंदिर सौंदर्यीकरणासाठी २२० कोटी, जगन्नाथ शंकरशेट स्मारकासाठी ३५ कोटी, तर भागोजीशेठ कीर स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> जगात भारी ‘मुंबईचा वडापाव’; जगप्रसिद्ध सँडविचच्या यादीत मिळाले ‘हे’ स्थान

JP Gavit, pesa recruitment, Nashik, JP Gavit agitation
नाशिक : पेसा भरतीसाठी आंदोलन तीव्र करणार – जे. पी. गावित यांचा इशारा
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Deepak kesarkar dahihandi marathi news
मुंबई: गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार, सुरक्षेसाठी उपाययोजना; पालकमंत्र्यांचे आदेश
Youth murder in Panchvati, Nashik,
नाशिक : पंचवटीत युवकाची हत्या, महिलेकडून दोन लाखाची सुपारी, चार जण ताब्यात
Ravindra Chavan, Ramdas Kadam,
रामदास कदमांनी कोकणासाठी ४० वर्षांत कोणते दिवे लावले? सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची खरमरीत टीका
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “कुटुंब फोडलं, पक्ष फोडले, हेच देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व का?” रोहित पवारांची सडकून टीका; अजित पवारांनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
Kolhapur, Sangeetsurya Keshavrao Bhosle Theater, Chief Minister Eknath Shinde, Rs 20 crore fund, fire incident, historical theater, Rajarshi Shahu Maharaj,
केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी २० कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाहणीनंतर घोषणा

महालक्ष्मी, मुंबादेवी, हाजी अली प्राचीन देवस्थान आहेत. त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देतानाच भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोयीसुविधा करण्यात याव्यात. महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिराचा विकास करताना परिसरातील मंदिरांचेही सौंदर्यीकरण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहनतळाची सोय करताना स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करावी. मंदिरांचे सौंदर्यीकरण करतानाच प्राचीन स्थापत्य शैलीचाही वापर करण्याच्या सूचना त्यांनी केली. यावेळी महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजी अली दर्गा, जगन्नाथ शंकरशेट स्मारक व भागोजीशेठ कीर स्मारकाच्या कामांचे सादरीकरण केले. जगन्नाथ शंकरशेट स्मारक वडाळा येथे करण्यात येत आहे. मुंबई पालिकेने तातडीने ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करावे, असे आदेशही शिंदे यांनी महापालिकेला दिले.