अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी माफी मागितल्याने या वादावर पडदा टाकण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अनुचित वक्तव्ये केल्याने भाजपमध्ये संताप असून मुख्यमंत्र्यांनी हजर राहू नये, असा त्यांचा आग्रह होता.