मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ३२.५ किमी अंतराच्या रस्त्यावर रस्तारोधक (बॅरिकेट्स) उभे केले असून अनेक ठिकाणी रस्ते बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने रस्तारोधक हटवून मार्ग पूर्ववत करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता रोधकमुक्त करण्यात येणार आहे.

‘मेट्रो ३’ ही भुयारी मार्गिका असून भुयारीकरण, अवाढव्य अशा १७ ‘टेनल बोअरिंग मशीन’ (टीबीएम) जमिनीखाली पाठवण्यासाठी कुलाबा ते सीप्झदरम्यान रस्तारोधक उभे करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. हे कसम २०१६ पासून सुरू आहे. त्यामुळे हे अडथळे मुंबईकरांना अडचणीचे ठरत असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर आहे. सणासुदीच्या काळात या मुद्यावरून ‘एमएमआरसी’ आणि नागरिकांमध्ये अनेक वेळा वाद झाला होता. आता मात्र हा त्रास दूर होणार आहे.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

‘मेट्रो ३’चे काम वेगात सुरू असून सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरसी’चे नियोजन आहे. तसेच अनेक ठिकाणी मार्गिका आणि भुयारी मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने अडथळे हटवून रस्ते मोकळे करण्यात येतील, अशी माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली.

फेब्रुवारी २०२३ पर्यंत संपूर्ण मार्गातील रस्ता रोधक हटवून रस्ता मोकळा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून रस्तारोधक हटविण्यास सुरुवात होणार आहे.