नाशिकमधील बाणगंगा खोऱ्यात यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बाणगंगा खोऱ्यातील कसबे सुकाणा येथे ३.२ इतके निच्चांकी तापमान नोंदविण्यात आले. नाशिकच्या इतर भागातही तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. सध्या नाशिकमध्ये ६.४ तर निफाडमध्ये ५ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. गेल्या काही दिवसांत नाशिकसह राज्यातील इतर भागांमध्ये थंडीने चांगलचा जोर धरलेला दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात पहाटेच्या सुमारास दवबिंदू गोठत असल्याचे प्रकार समोर आला होता. मात्र, परिसरात तापमापक नसल्याने नेमक्या तापमानाची नोंद करण्यात आली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold wave in maharashtra lowest temperature in nashik
First published on: 27-01-2016 at 09:22 IST