मालाड येथील पिंपरीपाडा परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यायीन युवकाने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. हेमंत नरवाडे (१८) असे त्याचे नाव आहे. वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले होते.
हेमंत मालाडच्या एका महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत होता. पिंपरी पाडय़ातील आझाद नगर येथे तो वडिल आणि भावासह रहात होता. सोमवारी सकाळी त्याचे वडिल त्याला उठवायला गेले तेव्हा त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. आत्महत्येपुर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. मी निराश असून घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले होते. हेमंतचे वडील खाजगी कंपनीत कामाला होते तर आई गावी रहात होती.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हेमंतमध्ये न्युनगंडही निर्माण झाला होता. या प्रकरणी कुरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.