मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रजनी पाटील आणि भाजपच्या संजय उपाध्याय यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल के ले. खुल्या पद्धतीने मतदान असले तरी भाजपच्या विजयाचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी के ला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या पाटील आणि भाजपच्या उपाध्याय यांचे अर्ज दाखल झाले. खुल्या पद्धतीने मतदान असल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते विजयाबाबत निर्धास्त आहेत. रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल के ला तेव्हा बाळासाहेब थोरात, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. भाजपच्या उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल के ला तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

  पोटनिवडणूक असल्याने ती बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या नेत्यांना याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाकडून आमच्याकडे अद्याप कोणी विनंती के लेली नाही. तसा काही प्रस्ताव आल्यास पक्षात चर्चा करूनच मग निर्णय घेतला जाईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट के ले. पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजप ही पोटनिवडणूक लढविण्याबाबत फार  गंभीर नसल्याचे संके त मिळत आहेत.

चंद्रकांत पाटील आशावादी

 राज्यात ५६ आमदार असलेल्या पक्षाचे मुख्यमंत्री, ५४ आमदार असलेल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आणि ४४ आमदार असलेल्या पक्षाचे महसूलमंत्री होतात, तर भाजपचे १०६ आणि १३ अपक्ष अशा ११९ च्या संख्याबळावर भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांना राज्यसभा पोटनिवडणुकीत निश्चिात विजय मिळेल. अन्य पक्षांच्या आमदारांकडून मतदान होईल,  असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी के ला.   राज्यसभा निवडणुकीत जरी खुले मतदान असले, तरी आमदारांना व्हीपला आपले मत दाखवावे लागते, मात्र ते प्रतिपक्षाच्या उमेदवारास दिले, तरी त्याला अपात्र ठरविले जाऊ शकत नाही, असा दावाही पाटील यांनी के ला.  त्यामुळे अन्य पक्षातील आमदार भाजप उमेदवाराला मतदान करतील, असे पाटील म्हणाले.