मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दहा तोंड असल्याचे चित्र तयार करत ते समाजमाध्यमांवर पसरवले. त्याच्या निषेधार्ह शुक्रवारी चेंबूरमध्ये काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे चित्र काही समाजमाध्यमांवर गुरुवारी रात्री पसरले. त्याची शुक्रवारी सकाळी माहिती काँग्रेसच्या नेत्यांना मिळताच त्यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध करत अनेक ठिकाणी आंदोलने केली.

काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृवाखाली चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर देखील काही काँग्रेस कार्यकर्त्यानी या निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप असे कृत्य करून पाप करत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला असून राहुल गांधींच्या केसला तरी धक्का लागला तर आम्ही भाजपला सळो की पळो करू असा इशारा यावेळी पटोले यांनी केले आहे.

No sign of Gandhis yet from Amethi
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?
Akshay Kanti Bam Milind Deora Ashok Chavan leaders left Congress Lok Sabha polls
इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवार भाजपात; निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडणाऱ्या नेत्यांची यादी
chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…