मुंबई : व्यावसायिक शत्रुत्वातून ‘बॉम्बे डाईंग’चे तत्कालीन प्रमुख नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना साक्ष देण्यासाठी बोलवण्याची आरोपीने मागणी केली होती. सीबीआयने गुरुवारी त्याला विरोध केला. सरकारी पक्षाच्या साक्षीदाराला उलटतपासणीसाठी पाचारण करण्याचा आरोपीला अधिकार नसल्याचा दावाही सीबीआयने केला. १९८८-८९ मधील या प्रकरणातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज केला आहे. त्यात त्याने अंबानी यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. न्यायालयानेही त्याच्या अर्जाची दखल घेऊन सीबीआयला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुरुवारी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानुसार, साक्षीदारांची तपासणी करणे किंवा त्यांना वगळणे तपास यंत्रणेचा अधिकार आहे, असे सांगण्यात आल़े
संग्रहित लेख, दिनांक 29th Jul 2022 रोजी प्रकाशित
नस्ली वाडिया यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचे प्रकरण अंबानींना साक्षीदार म्हणून बोलावण्यास विरोध
१९८८-८९ मधील या प्रकरणातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज केला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-07-2022 at 06:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conspiracy to murder nusli wadia cbi opposes plea to call mukesh ambani as witness zws