scorecardresearch

मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईत करोना रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट नोंदविण्यात आली़  दिवसभरात १९२ नवे रुग्ण आढळल़े  तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी रुग्णनोंद आह़े 

मुंबई : मुंबईत करोना रुग्णसंख्येत सोमवारी मोठी घट नोंदविण्यात आली़  दिवसभरात १९२ नवे रुग्ण आढळल़े  तिसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी रुग्णनोंद आह़े  मुंबईत दिवसभरात ३५० रुग्ण करोनामुक्त झाल़े  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाली आह़े २५१३ जणांवर उपचार सुरू आहेत़  रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने मुंबई पालिका आणि आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आह़े दरम्यान, राज्यातही रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून, १,९६६ नव्या रुग्णांची नोंद झाली़  दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात ११४०८ रुग्ण करोनामुक्त झाले असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ३६,४४७ झाली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus infection corona positive patient akp 94

ताज्या बातम्या