दीड लाख मात्रा उपलब्ध; तीन दिवसांपुरता साठा

मुंबई : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून लशींचा तुटवडा निर्माण झाला होता. रविवारी के वळ ३८ केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. मात्र रविवारी रात्री १ लाख ५८ हजार मात्रा मुंबई महानगर पालिकेला प्राप्त झाल्या. शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू के ल्यानंतर पुढील तीन दिवस लसीकरण सुरळीत सुरू राहणार असल्याची ग्वाही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबईत १३२ लसीकरण केंद्रे असून त्यात महानगरपालिका व राज्य आणि केंद्र सरकारची  ५९ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३  केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते आहे.  त्यामुळे उपलब्ध लससाठ्याचे नियोजन करताना दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. रविवारी दिवसभर के वळ ३८ केंद्रे सुरू होती. ही केंद्रे देखील लससाठा असेपर्यंत सुरू राहतील असे पालिके तर्फे  सकाळीच समाजमाध्यमांवर स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे रविवारी दिवसभरात लसीकरणाचे प्रमाण कमी होते. दिवसभरात २३,४१३ लोकांना लस दिली. त्यात ११ हजार लोकांनी दुसरी मात्रा घेतली.

मुंबई महानगर पालिकेला रविवारी कोविशिल्ड लसीच्या १ लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या ८ हजार अश्या एकूण १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, प्राप्त लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय सीमित असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल.

लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्यांनी लस साठा रविवारी नेला नाही त्यांना आज सकाळी ८ वाजेपासून तो नेता येईल. त्या केंद्रांवर सोमवारी लसीकरण उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे, असे पालिके ने स्पष्ट के ले आहे.

पालिकेची आणखी तीन केंद्रे

सोमवारपासून पालिके ची तीन नवीन केंद्रे सुरू होणार आहेत. देवनार प्रसुतीगृह, गोरेगाव येथील मोतीलाल नगर हेल्थ पोस्ट, मरीन लाईन्स येथील चंदनवाडी दवाखाना येथे ही    केंद्रे सुरू होणार आहेत.