लॉकडान संपेल तेव्हा एक्झिट प्लॅन काय असेल अशी विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे हजर होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी झालेल्या चर्चेसंबंधी माहिती दिली. यावेळी त्यांनी लॉकडाउनमुळे राज्य सोडून गेलेल्या परप्रांतीयांना तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेतलं जाऊ नये असा सल्ला दिला असल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लॉकडाउनसंबंधी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, “लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन कायम ठेवू शकत नाही. तो आयत्या वेळी सांगून उपयोग नाही. त्यामुळे लॉकडाउन कसा काढणार त्याची आधी कल्पना द्यावी. काय सुरु होईल, काय बंद राहणार हे लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला आणि संध्याकाळच्या विमानाने करोना गेला असं होणार नाही”.

आणखी वाचा- रमजानमुळे रस्त्यावर होणारी गर्दी रोखण्यासाठी राज यांचा उद्धव यांना महत्त्वाचा सल्ला

“परप्रांतीय कामगार परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाऊ नये. त्या राज्यात काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना नाही. तसंच त्याच वेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो,” असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. “गेले दीड महिना पोलीस थकले असून प्रचंड तणावाखाली आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरलं जात आहे. अशा ठिकाणी  एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus mns chief raj thackeray asks about lockdown exit plan cm uddhav thackeray sgy
First published on: 07-05-2020 at 16:34 IST