अंडी महागली!

अंडी ही सर्वसामान्यांच्या रोजच्या खाण्यातील गोष्ट आता हळूहळू महाग होऊ लागली असून मंगळवारी तर मुंबईत अंडय़ांचा भाव डझनाला ६४ रूपये इतका मोजावा लागत होता.

अंडी ही सर्वसामान्यांच्या रोजच्या खाण्यातील गोष्ट आता हळूहळू महाग होऊ लागली असून मंगळवारी तर मुंबईत अंडय़ांचा भाव डझनाला ६४ रूपये इतका मोजावा लागत होता. सरासरी ४० ते ४५ रूपये डझन अशी मिळणारी अंडी एकदमच भाव वाढल्यामुळे सामान्यांच्या ताटातूट हद्दपार होणार की काय अशी चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
खिस्रमसच्या पाश्र्वभूमीवर दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून हेच दर ७० रूपये प्रति डझन होण्याची शक्यता आहे. अंडय़ांचे दर अचानक वाढले असून ते घाऊक बाजारात ५५ ते ६० रूपये प्रति डझन या दराने विकले जात आहेत. घाऊक विक्रीचा शेकडा दर ३०० रूपये अताना तो ४२८ रूपयांवर पोहोचला आहे. यामुळे किरकोळ बाजारातही अंडय़ांचा भाव चांगलाच वाढला आहे. थंडीत अंडय़ांची मागणी वाढली असून त्याचे उत्पादन मात्र कमी झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Costs of eggs at record high level

ताज्या बातम्या