आज पुन्हा सुनावणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई :  महागाई भत्त्यात वाढ करा आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा या मागण्यांसाठी संप वा काम बंद करण्यास एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने बुधवारी मनाई के ली. या प्रकरणी गुरुवारी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने याचिके वर सुट्टीकालीन न्यायालयासमोर साडेआठच्या सुमारास सुनावणी झाली. त्यावेळी याचिके ची सुनावणी गुरुवारी ठेवत न्यायालयाने कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांना संप करण्यापासून व काम बंद करण्यास मज्जाव के ला.

कर्मचाऱ्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्याविरोधात एसटी महामंडळाने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिके वर झालेल्या सुनावणीच्या वेळी आपल्या मागण्यांसाठी मागण्यांसाठी राज्यातील विविध आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप सुरू के ला होता. कर्मचाऱ्यांनी संप वा काम बंद करू नये यासाठी महामंडळाने सर्वतोपरी प्रयत्न के ला, असा दावा महामंडळातर्फे  करण्यात आला. परंतु २७ ऑक्टोबरपासून काही आगारांमध्ये बेकायदा संप सुरू करण्यात आला. २९ ऑक्टोबरला औद्योगिक न्यायालयानेही कर्मचाऱ्यांना संप न करण्याचे आदेश दिले. परंतु ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रापासून संपाचा इशारा देत मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची संघटना व्यवस्थापनावर दबाव टाकत आहे, असा आरोपही महामंडळाने के ला.

 कर्मचाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये नागरिकांची विशेषकरून ग्रामीण भागांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, असेही महामंडळातर्फे  न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांची संघटना आणि कर्मचाऱ्यांना संप वा काम बंद आंदोलन करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी के ली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court bans st workers from going on strike hearing again today akp
First published on: 04-11-2021 at 01:04 IST