दहीहंडीचा उत्सव यंदा न्यायालयांच्या निर्णयामुळे केंद्रस्थानी राहिला आहे. उंचीवरील व गोविंदांच्या वयावरील र्निबधांमुळे अनेक दहीहंडी आयोजकांनी माघार घेतली असतानाच न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून मोठे दहीहंडी उत्सव रविवारी कसे साजरे होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

शहरात रविवारी तब्बल ३४७० ठिकाणी दहीहंडी असतील. यातील ८०० ठिकाणी मोठय़ा स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. याच वेळी दणदणाटी आवाज किती मर्यादेत राहतो याकडे पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ करडी नजर ठेवून आहेत.निवासी संस्थांमध्ये बाळगोपाळांसाठी कमी उंचीच्या हंडय़ा शनिवारपासून बांधण्यात आल्या होत्या. रविवारी अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

वाचकांना आवाहन..

न्यायालयाचे मंडप व ध्वनीप्रदूषणावरील र्निबध झुगारून नियमभंग करणारी दहीहंडी झाली वा गणेशोत्सवासाठी रस्ते अडवले गेले तर त्याची माहिती व छायाचित्रे ‘लोकसत्ता’च्या खालील ई-मेलवर पाठवावीत. loksatta@expressindia.com