अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तिच्या १७ वर्षीय चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते.
ही पाच वर्षांची मुलगी डी. एन. नगरमध्ये आपल्या आई-वडिलांबरोबर राहात होती. अचानक ४ जुलै रोजी तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर बलात्कार झाल्याचे वैद्यकीत तपासणीत डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉक्टरांनी तात्काळ डी. एन. नगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तिच्या घराच्या आसपास अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या १७ वर्षांच्या चुलत भावाचीही चौकशी केली असता तो काही तरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी आपला खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2013 रोजी प्रकाशित
चिमुरडीवर चुलत भावाकडून बलात्कार
अंधेरीच्या डी. एन. नगरमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी तिच्या १७ वर्षीय चुलत भावाला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले होते. ही पाच वर्षांची मुलगी
First published on: 11-07-2013 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cousin brothers rape her sister