संदीप आचार्य

राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने जय्यत तयारी सुरु केली असून ऑक्सिजन खाटांसह एकूण ३० टक्के खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लहान मुलांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवताना ३०० बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पहिल्या लाटेत साडेतीन लाख रुग्णसंख्या नोंद आहे तर दुसऱ्य़ा लाटेत हिच संख्या दुप्पट म्हणजे सुमारे सात लाख ८० हजार एवढी वाढली. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकार व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या अंदाजात तफावत आढळून येते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत राज्यात साडेअकरा लाख ते बारा लाख एवढे रुग्ण असतील तर राज्याच्या आरोग्य विभागाचा अंदाज हा साडेदहा लाख रुग्ण एवढा आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या शक्यतेचा विचार करून आरोग्य विभागाने करोना रुग्णांवरील उपचाराची नवी रणनिती आखली असून यात लहान मुलांवरील उपचाराला तसेच म्युकरमायकोसीससारखे अन्य आजारांचा विचार करण्यात आला आहे. यासाठी उपचारांचे प्रोटोकॉल नव्याने तयार करण्यात आले असून रुग्ण चाचणीसाठी प्रयोगशाळा संख्या न वाढवता चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. रुग्णांना वेळेत दाखल होता यावे यासाठी ११०० नवीन रुग्णवाहिका घेण्यात येणार असून यातील १०० रुग्णवाहिका या ‘सीएसआर’च्या माध्यमातून मिळाल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 maharashtra health ministry preparation for third wave sgy
First published on: 01-06-2021 at 14:19 IST