अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या  दिशेने सरकत आहे. तौते चक्रीवादळाने रविवारी मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर तडाखा देण्यास सुरुवात केली असून, पहाटे पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. रविवारी सकाळी तौते चक्रीवादळाने तीव्र स्वरुप धारण केले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले. १८ मे रोजी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ पोरबंदर आणि महुवा (भावनगर जिल्हा) दरम्यान गुजरात किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ पणजी-गोव्याच्या नैऋत्य दिशेला सुमारे १५० कि.मी., मुंबईपासून ४९० कि.मी. दक्षिणेस आणि वेरावळ (गुजरात) च्या दक्षिण- नैऋत्येकडे ७३० कि.मी. वर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तौते चक्रीवादळामुळे सोमवारी मुंबईत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे अशी माहिती आयएमडीने दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone tauktae heavy rains in mumbai tomorrow orange alert from the weather department abn
First published on: 16-05-2021 at 18:36 IST